शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाच उमेदवारांनी घेतली माघार

By admin | Updated: May 30, 2016 00:31 IST

आयमा निवडणूक : ५४ उमेदवार रिंगणात; ५ जूनला मतदान

 सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.२९) अर्ज माघारीच्या दिवशी ५९ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. अंतिम यादी सोमवारी (दि.३०) नोटीस बोर्डवर लावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर ब्राह्मणकर व राजकुमार ज्वाली यांनी दिली.आयमा निवडणुकीत मागील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अधिकारी मधुकर ब्राह्मणकर व राजुकमार ज्वाली हे निवडणुकीचे कामकाज पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत असल्याने या निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटाचे सरचिटणीस पदाचे उमेदवार निखिल पांचाळ यांचा याआधीच अर्ज बाद केल्याने विरोधी गटाचे सरचिटणीसपदाचे उमेदवार क ैलास अहेर यांची बिनविरोध निवड होणे शक्य आहे. निवडणुकीत २४ जागांसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, यापैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी पाच उमेदवारंनी माघार घेतली. यात सत्ताधारी गटाचे उमेश कोठावदे हे बाहेरगावी असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ग्राह्य धरला होता. आज अर्ज माघारीच्या दिवशी कोठावदे यांनी माघार घेतल्याने या वादावर पडदा पडला आहे.कोठावदे यांच्यासह अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले प्रकाश ब्राह्मणकर, नेहा मैसपूरकर, प्रसाद जाधव, निरज बदलाणी या पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. येत्या दि. ५ जून रोजी मतदान व ६ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक अधिकारी ब्राह्मणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)