शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

ंमनमाडला दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यूमनमाड : गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली. उत्सवाला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पोलीस बंदोबस्तात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.येथील इदगाह भागात असलेल्या गणराज गणेश मंडळासमोर शनिवारी रात्री विविध कार्यक्रम सुरू होते. नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह १३ जणांनी या ठिकाणी येत येथे उभ्या असलेल्या राहुल कन्हैयालाल चुनियान (१७) यास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत चाकू व कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मृताचा भाऊ शुभम चुनियान याने मनमाड पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी संशयित अमिन कासम शेख (पटेल), जाकीर शेख, मतीत गुलाम शहा, सद्दाम बादशहा अत्तार, असीफ पटेल, सोहेल जाकीर शेख, अरबाज, जाबाज, रज्जू (तिघांची पुर्ण नावे माहीत नाही), लाला पटेल, समील रफीक पठाण, सोहेब उर्फ मोन्या जाकीर शेख व अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या गटाकडून अमिन कासम शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चुनियान, योगेश रतन चुनियान, शुभम कन्हैयालाल चुनियान, प्रकाश दिलीप खडांगळे, ललित मनीष पाठक, संदीप मधुकर कांबळे, सोनू मंगवाना, संजय चिंडालीया व अन्य आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन हे रात्रीपासूनच शहरात तळ ठोकून आहेत. रुगणालयात पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी, निरीक्षक भागवत सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव, कळवण येथील पोलीस कुमक व राज्य राखीव दलाच्या जवानाच्या तुकड्यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृत राहुल याचा मृतदेह बंदोबस्तात निवास्थानी नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाइकांनी शवविच्छेदन अहवाल व एफआयआर प्रत मिळाल्या शिवाय अंत्ययात्रा काढणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)