शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पहिले विश्व मराठी ऑनलाइन साहित्य संमेलन २८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:08 IST

जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे.

ठळक मुद्देजगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना जोडण्याचा प्रयत्न 

नाशिक : जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे.वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित या संमेलनात एक दिवसाच्या स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलनाचाही समावेश आहे. संमेलन सर्वांसाठी पूर्णतः निःशुल्क असून, वैश्विक स्तरावर होणारे हे असे पहिलेच मराठी ऑनलाइन संमेलन ठरेल. सुमित्राताई महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून उत्तर अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी या संमेलनाच्या महासंरक्षक असतील. संमेलनामध्ये प्रथमच ९ जणांचे अध्यक्षीय मंडळ राहणार आहे. डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष राहणार आहेत. तर साहित्य विभागात भारत सासणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, संस्कृती विभाग - सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट, उद्योजक विभाग - डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल पंडित-कुलकर्णी, युवा विभाग - उमेश झिरपे आणि अजित रानडे हे संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी संकेतस्थळावर करण्याचे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. देश-विदेशातील मराठी भाषिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.२५ देशांमध्ये स्वागताध्यक्ष२५ देशांमधून २५ स्वागताध्यक्ष असून, लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलन आयोजक कार्यकारिणी ही ५१ जणांची असून, त्यात भारताबाहेरील विविध देशांतील २५, महाराष्ट्रातील १५ आणि भारतातील इतर राज्यांतील ११ व्यक्तींचा समावेश आहे. संमेलनामध्ये सुमारे ३२ देशांतील, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक बांधव तसेच १५०हून अधिक संस्था, ५००हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालये सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक