शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’ सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिलेला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:56 IST

नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरुवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे दोन महिलांमध्ये सरळ सामना होणार असला तरी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड निश्चित आहे.

ठळक मुद्देमहापालिका : भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडकेंना उमेदवारी विरोधकांच्या वतीने शिवसेनेच्या संगीता अमोल जाधव यांचा अर्ज दाखल

नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरुवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे दोन महिलांमध्ये सरळ सामना होणार असला तरी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड निश्चित आहे.स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी येत्या शनिवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, सत्ताधारी भाजपाकडून प्रभाग ७ मधील नगरसेवक हिमगौरी अहेर-आडके यांनी नगरसचिव राजेंद्र गोसावी यांच्याकडे सादर केला. हिमगौरी अहेर यांनी तीन अर्ज दाखल केले. सूचक-अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर महापौर रंजना भानसी, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर, शांता हिरे, गणेश गिते, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील यांच्या स्वाक्षºया आहेत. अहेर यांचा अर्ज दाखल करण्यात आला, त्याप्रसंगी महापौरांसह उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप आदी उपस्थित होते. त्यापूर्वी, विरोधकांच्या वतीने शिवसेनेच्या संगीता अमोल जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. जाधव यांचे दोन अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून कॉँग्रेसचे समीर कांबळे व सेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व संतोष साळवे यांच्या स्वाक्षºया आहेत.