शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात प्रथमच तबला-चिल्ला

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

अमृतनाद : मुक्तांगण व कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे चार सत्रांत होणार अखंड तबलावादन

नाशिक : नाशिकमध्ये प्रथमच तबला-चिल्ला हा अखंड तबलावादनाचा कार्यक्रम होणार असून, येत्या शुक्रवारपासून तीन दिवस हा तालसोहळा कुसुमाग्रज स्मारकात रंगणार आहे. सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नादसाधकांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरविण्यात येणार आहे. मुक्तांगण व कुसुमाग्रज प्रतिष्ठान प्रस्तुत आणि आदिताल तबला अकादमी आयोजित ‘अमृतनाद’ हा कार्यक्रम दि. ३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ज्येष्ठ तबलावादक पंडित नारायण जोशी, पंडित शशिकांत मुळे आणि पंडित कमलाकर वारे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश गायतोंडे, पंडित बापूसाहेब पटवर्धन आणि वेदमूर्ती पंडित शांतारामशास्त्री भानोसे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच तबला-चिल्ला हा अखंड तबलावादनाचा कार्यक्रम होत आहे. येत्या शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता अथर्व वारे, सायली मधुरे, सुजित काळे व कल्याण देशपांडे तबलावादन करतील, तर शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता प्रमोद भडकमकर, माधव वर्तक, प्रसाद रहाणे, रसिक कुलकर्णी व नितीन डेगवेकर तबलावादन करतील. त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता नितीन पवार, सुधाकर पैठणकर, अभिमन्यू हेर्लेकर, आनंद शिधये यांचे तबलावादन होईल. दि. २ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वर सोनवणे यांचे संवादिनीवादन होणार असून, तबलासाथ दिगंबर सोनवणे करणार आहेत. त्यानंतर गिरीश गोगटे यांचे तबलावादन होईल. तबला-चिल्ला कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ तबलावादक पंडित बापूसाहेब पटवर्धन यांच्या तबलावादनाने होईल. एकूण अठरा तबलावादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)