शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:45 IST

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबालभारतीकडून पुरवठा महापालिकेच्या केंद्रात मात्र पुस्तके पडून

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.इयत्ता पहिलीच्या बदलेल्या अभ्यासक्रमामुळे शाळांना १५ जूनपूर्वी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होऊ शकला नसल्याने पहिलीच्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळालीच नाही. मात्र शाळा सुरू झाल्यानंतरही पहिलीचे विद्यार्थी अजूनही पुस्तकांपासून वंचित आहेत. पहिलीच्या अभ्यासक्रमाची तीन पुस्तके असून, काही शाळांना एक, तर काही शाळांना दोन पुस्तके मिळाली आहेत. सिडकोतील काही शाळांना तीनही पुस्तकांचा पुरवठा झाल्याचे सांगितले जाते. मात्र शहरातील अन्य भागातील शाळांना अजूनही पुरेसा पुरवठा झाला नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अजूनही वंचित राहिले आहेत.बालभारतीकडून होणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा महापालिकेच्या भालेकर शाळेतील केंद्रात होतो. येथून मनपा हद्दीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जातो. बालभारतीकडून महापालिका हद्दीतील शाळांनी मागणी केल्यानुसार सुमारे ६ लाख ३७ हजार ८ पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते आठवीच्या वर्गांना सुमारे २८ लाख ६५ हजार ४२२ याप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे.पाठ्यपुस्तकांप्रमाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या केंद्रामध्ये तर जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये पाठ्यपुस्तके जमा होऊन तेथून ती शाळांना मागणीपत्राप्रमाणे वितरित केली जातात. बालभारतीने दिलेल्या आकडेवारीवरून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. असे असतानाही पहिलीच्या मुलांना मात्र अजूनही पुस्तके मिळाली नसल्याचे मुख्याध्यापकांकडूनच सांगितले जात आहे.