शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रस्त्यांची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:51 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचे हाल : धानोरे, रूईतील वाहनचालक त्रस्त

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार परिसरातून मागणी होऊनदेखील सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथून प्रवास करणारे शेतकरी, विद्यार्थी, रहिवासी हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची वेळीच दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्यांचे स्वरूप पाण्याच्या तळ्यांमध्ये झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका वादळी पावसामध्ये रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या दीड ते दोन फुटांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.सदरच्या रस्त्याने हजारो शेतकरी विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतमाल विक्र ीसाठी नेत असतात. रस्त्याची अवस्था पाहिली असता तेथून वाहन न्यावे की नाही, असा प्रश्न चालकांपुढे पडतो. नादुरु स्त रस्त्यांमुळे परिसरामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच होत आहे. या भागातील रस्ते मृत्यूचा सापळा तर होणार नाही नाही ना, असा प्रश्न तेथील रहिवाशी व प्रवाशांना पडत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकवेळा लेखी तक्र ारी केल्या आहेत. परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रोज प्रवास करणारे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती, रहिवाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरु स्तीसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ रस्त्यातील मोठे खड्डे बुजवून परिसरातील नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.