शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत आढळला म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक व परिसरात संसर्ग वाढत असताना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारानेही धास्ती निर्माण केली आहे. नाक, ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक व परिसरात संसर्ग वाढत असताना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारानेही धास्ती निर्माण केली आहे. नाक, घसा तज्ज्ञाकडे रोज चार-पाच रुगण उपचारासाठी येत आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची आरोग्य यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून, शहरात या रुग्णांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोळ्यासारखा महत्त्वाचा अवयवही निकामी होत आहे. जुने सिडको भागातील युवकाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. यात एचआरसीटी स्कोर वाढला होता. शहरातील खासगी रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतर त्याने कोरोनावर मात केली. मात्र काही दिवसातच या रुग्णाच्या एका डोळ्याची संवेदना नष्ट झाली. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले व शस्त्रक्रिया करून निकामी झालेला डोळा काढून टाकण्यात आला. त्यानंतरही त्रास झाल्याने शहरातील तिसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, काही दात काढणार असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. सिडकोसारख्या भागात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

या रुग्णाने कोरोनावर मात केली असली तरी त्याचा एक डोळा या आजारामुळे काढून टाकावा लागला आहे आणि अजूनही संबंधित रुग्णावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सिडको हा दाट वस्तीचा भाग असल्याने या ठिकाणी अशा संसर्गाचा प्रसार ताबडतोब होऊ शकतो त्यामुळे आता नागरिकांनी याची खबरदारी घेऊन स्वतःबरोबरच इतरांचेही रक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सिडकोतील शिवाजी चौक परिसरात अशा प्रकारचा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आता या सर्व प्रकाराबाबत महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.