नाशिक : मुंबई महापालिकेत शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपाने टाकलेल्या पारदर्शक कारभारावर काहीशी टीका झाली असली तरी आता असाच कारभार करण्यासाठी भाजपा महापालिकेच्या कामकाजात काही सुधारणा करणार आहेत. विशेषत: मंजूर विषयांच्या इतिवृत्तात मागल्या दराने ठराव घुसवण्याचा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे झालेल्या महासभेचे इतिवृत्त तत्काळ पुढील सभेत मंजुरीसाठी सादर करण्याचा प्रयोग केला जाणार आहे. महापालिकेतील कामकाजात पारदर्शकता असावी यासाठी भाजपाने निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा केला होता.
पहिल्या सभेचे इतिवृत्त दुसऱ्या सभेत मंजुरीसाठी
By admin | Updated: March 13, 2017 01:15 IST