शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

आधी लग्न रायबाचे.. मग कोंढाण्याचे...

By admin | Updated: October 3, 2015 00:12 IST

अजब सरकार : ना पद निर्मिती, ना नोकर भरती फक्त निवडणुकीची घाई

नाशिक : राज्यातील २४ जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी घेण्यात येत असलेली निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन आणखी एक महिन्यानी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांकडून नगरपंचायतीचा पदभारही स्वीकारला जाणार असला तरी, प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ पाहणाऱ्या नगरपंचायतींची अवस्था मात्र ग्रामपंचायतींसारखीच राहील यात तिळमात्र शंका नाही. कारण नगरपंचायतीचा कारभार हाकण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सरकारलाच विसर पडला असून, त्या करण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याचा प्रकार म्हणजे ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ ऐवजी ‘रायबाचे’ असेच म्हणावे लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे आघाडी सरकारच्या काळातच मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेऊन विद्यमान सरकारने त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.येत्या महिन्यात या नगरपंचायतींचा कारभार नव नियुक्त लोकप्रतिनिधींच्या हाती बहुधा सोपविलाही जाईल परंतु हे करत असताना सरकारने निव्वळ कमालीची राजकीय घाई चालविल्याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. मोठ्या म्हणून गणल्या गेलेल्या व सध्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने एक छदामही नगरपालिका विभागाला उपलब्ध करून दिलेला नाही, उलट ग्रामपंचायतींमध्ये शिल्लक असलेल्या रकमेतून निवडणूक खर्च भागविण्याची सूचना करण्यात आलेली असून, ज्या ग्रामपंचायती सधन आहेत, त्यांच्या निवडणूक खर्चासाठी तजवीज होऊ शकलेली आहे; मात्र आदिवासी भागातील ग्रामपंचायतींमध्ये नाममात्र घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याची भ्रांत असल्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकांसाठी येणारा लाखोंचा खर्च कसा भागवावा असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. शिवाय शिल्लक असलेला निधी निवडणुकीवर उधळल्यानंतर नगरपंचायतीतील रहिवाश्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्नही या अधिकाऱ्यांना भेडसावू लागला आहे. नगरपंचायतींमध्ये रूपांतर झालेल्या ग्रामपंचायतींचा पदभार सध्या अध्यक्ष म्हणून तालुका तहसीलदारांकडे सोपविण्यात आलेला असून, व्यवस्थापक म्हणून शासनाने तीन महिन्यांपूर्वी काही नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविला होता, परंतु त्यापैकी एकाही मुख्याधिकाऱ्याने ग्रामपंचायतींना हजेरी लावून अस्तित्वात येणाऱ्या नगरपंचायतीच्या कारभाराविषयी व्यवस्था केलेली नाही. उलट प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची सेवाही ग्रामविकास खात्याने आपल्याकडे वर्ग करून घेत ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने भरलेल्या अल्पशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींचा कारभार हाकला जात असून, अस्तित्वात येणाऱ्या नवीन नगरपंचायतींच्या कायद्यानुसार कोणत्या कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घ्यायची असा प्रश्नही निर्माण झाला आहे. ना पदांची निर्मिती ना नोकर भरती, ना मुख्याधिकारी, ना आरोग्याधिकारी, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबरोबरच जन्ममृत्यूची नोंद व स्वच्छता, पाणीपुरवठ्याबरोबर अग्निशमन दलाचीही वानवा आहे. पदाधिकाऱ्यांना दालन नाही, सदस्यांना सभागृह नाही, वीज, स्वच्छतागृहाचा तर पत्ताच नाही अशा एक नव्हे तर अनेक समस्यांचा डोंगर या अस्तित्वात येऊ पाहणाऱ्या नगरपंचायतींसमोर उभा आहे, त्यामुळे लोकशाहीमार्गाने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी हाती सत्ता घेतली तरी, नगरपंचायतींची अवस्था ग्रामपंचायतींसारखीच राहील अशी परिस्थिती आहे.