शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वादविवाद स्पर्धेत ‘मराठा’ प्रथम

By admin | Updated: September 26, 2016 00:16 IST

मालेगाव : एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेला प्रतिसाद

मालेगाव : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटी (काकाणी विद्यालय) तर्फे घेण्यात आलेल्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. तालुक्यातील मळगाव येथील केबीएच विद्यालयाने द्वितीय, तर चाळीसगाव येथील ए. बी. गर्ल्स हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. आजची प्रसारमाध्यमे बेजबाबदार आहेत’ हा स्पर्धेचा विषय होता. यावेळी पाठक यांनी अथक परिश्रम, वाचन, चिंतन, मनन आणि स्मरण यामुळे वक्तृृत्व प्रभावशाली ठरते. त्यामुळे श्रोत्यांना विषयानुरूप बांधून ठेवण्याची कला साध्य होते. समयसूचकतेमुळे सभाधिटपणाची रंगत वाढत श्रोता गुंतत जातो, असे प्रतिपादन केले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित होते. प्रकल्पप्रमुख सतीश कलंत्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. काकाणी कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक नारायण चौधरी यांनी स्पर्धेच्या नियमांची माहिती दिली. स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या श्रृती बोरसे व नेहा भंडारे यांनी प्रथम, मळगावच्या केबीएच विद्यालयाचे अतुल कदम व गीतांजली कदम यांनी द्वितीय, तर चाळीसगावच्या ए. बी. गर्ल्स हायस्कूलच्या अनुजा शिरोडे व स्वामिनी शितोळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यश अहिरे व वैभव बच्छाव यांना उत्तेजनार्थ, तर शामल चव्हाण, श्रृती बडजाते, कृष्णा रोकडे, भावेश गोस्वामी, सिद्धी देशपांडे, प्रणव जगताप यांनीही यश   मिळविले. विजेत्या स्पर्धकांना प्रथम- तीन हजार, द्वितीय- दोन हजार, तृतीय- एक हजार व उत्तेजनार्थ म्हणून ७०१ व ५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरोळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत १९ शाळांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून प्रा. सुरेश नारायणे, स्वाती गुजराती व बी. एस. अहिरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव व स्मीता पाटील यांनी केले. संस्थेचे सचिव नीलेश लोढा यांनी आभार मानले. यावेळी बन्सीलाल कांकरीया, विलास शहा, श्रीकांत बागडे, रामनिवास सोनी, प्रल्हाद शर्र्मा, सुभाष बाकरे, प्रकाश दातार, विजय कुलकर्णी, नितीन पोफळे, गोविंद तापडीया, भोगीलाल पटेल, रवींद्र दशपुते, अशोक मोरे, शोभा मोरे, कविता मंडळ, प्राचार्य संजय पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा हायस्कूलचे श्रृती बोरसे, नेहा भंडारे प्रथममालेगाव एज्युकेशन सोसायटी (काकाणी विद्यालय)तर्फे घेण्यात आलेल्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या श्रृती बोरसे व नेहा भंडारे यांनी प्रथम, मळगावच्या केबीएच विद्यालयाचे अतुल कदम व गीतांजली कदम यांनी द्वितीय, तर चाळीसगावच्या ए. बी. गर्ल्स हायस्कूलच्या अनुजा शिरोडे व स्वामिनी शितोळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.