शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जि.प.ची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ‘व्हीसी’द्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:38 IST

दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला,

ठळक मुद्देतांत्रिक दोषांच्या तक्रारी : ७५ सदस्य, अधिकारी सहभागीजवळपास चार तास चाललेल्या या सभेत अनेक विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला, तर अनेकांनी घरातून व काहींनी तालुक्याच्या पंचायत समितीतील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेत सहभागी झाले. जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्यांदाच केलेल्या या प्रयत्नात अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने काही सदस्यांनी आवाजाच्या तर काहींना रेंज मिळत नसल्याने संवाद साधण्यात वारंवार व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी केल्या, तरीही जवळपास चार तास चाललेल्या या सभेत अनेक विषयांवर चर्चा होवून जवळपास पदाधिकारी, सदस्य व अधिकारी मिळून ७५ जण या सभेत सहभागी झाले.

जिल्हा परिषदेची मागील अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा १६ मार्च रोजी घेण्यात आली, त्यानंतर मात्र अवघ्या आठवडाभरातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन, संचारबंदी जारी केल्याने जिल्हा परिषदेचे कामकाजही जवळपास दीड ते दोन महिने ठप्प झाले होते. या काळात प्रशासनाकडून मात्र आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवांवर लक्ष केंद्रित करण्यात आले तर या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्थायी समिती व विषय समित्यांच्या मासिक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले. सोमवारच्या सभेसाठी प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपल्या निवासस्थानातूनच अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी हजेरी लावली, तर उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, कृषी सभापती संजय बनकर यांच्यासह उदय जाधव, दीपक शिरसाठ, सिद्धार्थ वनारसे, यतीन पगार यांनी जिल्हा परिषदेत येऊन सहभाग नोंदविला. यावेळी प्रारंभी अनेक तांत्रिक कारणांमुळे सदस्यांना संवाद साधण्यात अडचणी आल्या. भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याच्या कारणाने सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या पॅसेजमध्ये येत सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभागृहात सुरक्षित अंतर पाळत सहभाग नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातून सहभागी झाले, तर अन्य खातेप्रमुखांनी आपापल्या कार्यालयातून सहभागी झाले. ग्रामीण भागातील अन्य सदस्यांनी त्या त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयातून सभेस हजेरी लावली. तांत्रिक कारणे दर्शविली गेली असली तरी, सभेच्या अजेंड्यावर असलेल्या २८ विषयांना मंजुरी देण्यात आली, शिवाय ५६ सदस्य व अधिकाऱ्यांसह जवळपास ७५ जण यात सहभागी झाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद