शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ई-फेरफार प्रणालीत नंदुरबार राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST

नाशिक : महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर ...

नाशिक : महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणे अशा ई-फेरफारमध्ये नाशिक विभागाने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याने या कामगिरीत प्रथम क्रमांक मिळविला असून, विभागातील पाचही जिल्ह्यांची कामगिरी पहिल्या पाचमध्ये राहिली आहे. महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करण्याबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून, नाशिक विभागातील नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, धुळे व नाशिक हे जिल्हे अनुक्रमे राज्यात एक ते पाच स्थानी आले आहेत. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधीनस्त अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी राज्यात ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे गमे यांनी यावेळी सांगितले.

ई-फेरफार नोंदीसाठी महाभूमी असे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे.

--इन्फो--

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील या कार्यक्रमाअंतर्गत संगणकीकृत सातबाराच्या डेटाचे अद्ययावतीकरण करणे, युनिकोडमध्ये रूपांतर करणे, तालुकास्तरावरील महसूल कार्यालयांची समांतर जोडणी करणे व दुय्यम निबंधक कार्यालयांची महसूल कार्यालयांशी जोडणी करणे या बाबी एकत्रित करण्यासाठी फेरफार प्रक्रिया राबविली जाते.