शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पहिले ‘आप’ करता करता इच्छुकांना ‘ताप’

By admin | Updated: January 31, 2017 00:43 IST

उमेदवारी याद्या रखडल्या : इच्छुकांना थोपविण्यासाठी राजकीय पक्षांच्या व्यूहरचना

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडे वाढलेली इच्छुकांची संख्या आणि ती न मिळाल्यास अन्य पक्षांना जाऊन मिळण्याची भीती यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिस्पर्धी पक्षांनी उमेदवारी घोषित केल्यानंतरच आपला पक्ष उमेदवारी यादी घोषित करेल, अशी भूमिका घेतली आहे. पहिले ‘आप’च्या या भूमिकेमुळे इच्छुकांच्या डोक्याला ताप झाला आहे. उमेदवारी घोषित होत नाही आणि त्यामुळे नीट भूमिका घेता येत नाही, अशी दावेदारांची स्थिती झाली आहे.महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन किमान आठ दिवस झाले आहेत. मात्र आता युती होते की आघाडी या घोळात प्रमुख पक्षांनी इच्छुकांचा जीव टांगणीला लावला आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही, हे भाजपाने १७ जानेवारीलाच स्पष्ट केले होते. तरीही मुंबईत सेना- भाजपा युतीच्या चर्चा झाल्यानंतर कदाचित नाशिकला युती होईल, अशी शक्यता वाटत होती. परंतु आता ती मावळली आहे. भाजपाने अंतर्गत बैठकांच्या अनेक फेऱ्या केल्यानंतरही २७ तारखेला पहिली यादी घोषित करण्याचा मुहूर्त टळला आहे. शिवसेनेने मुलाखती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही संपर्क प्रमुखांनी आणखी दोन दिवसांनी यादी घोषित करण्यात येईल, असे सांगून उमेदवारी जाहीर करणे लांबवले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून, केवळ तीन ते चार प्रभागात अडकलेली आघाडी आता अन्य पक्षांतील सक्षम उमेदवारांच्या प्रतीक्षेत आहे. महापालिकेत सर्वाधिक गळती लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेदेखील अशाच प्रकारे यादी टाळली आहे. सोमवारी राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर यादी घोषित करण्यात येईल, असे सांगणाऱ्या यादीचे नाव काढले नाही.  आपल्या पक्षाची यादी घोषित केल्यानंतर त्यातल्या त्यात स्पर्धेतील ज्या इच्छुकांना संधी मिळणार नाही, ते अन्य पक्षांच्या गळाला लागण्याची शक्यता असून, ते टाळण्यासाठीच याद्या थांबविल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इच्छुकांना स्पर्धा नाही, अशांनादेखील यामुळे थांबवावे लागले आहे. परंतु दोलायमान असलेल्या इच्छुक उमेदवारांची पंचाईत होणार आहे. (प्रतिनिधी)