ऑनलाइन लोकमत
घोटी, दि. २४ - संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या दीड हजार दस लक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण शनिवारी दुपारी अडिज वाजेच्या सुमारास काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागल्याने तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान तालुक्यात गेली दीड महिन्यापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली असून महत्वाचे समजले जाणारे दारणा धरणातही सॅमसमाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
मागील पंधरवड्यापासून पासून सुरु झालेल्या पावसाने अद्यापही इगतपुरी तालुक्यात उसंत न दिल्याने समाधानकारक होणाऱ्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीची पन्नास टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून,या वर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आतापर्यंत 1622 मि.मि. विक्रमी पाऊस झाल्याने तालुक्यातील धरन साठ्यात भरमसाठ वाढ झाली असून यातील भावली व त्रिंगल वाडी हि धरणे पूर्णपणे भरल्याने ओसंडून वाहत आहेत
दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येते.तसेच संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर अआहे.यामुळे मागील काही महिन्यात या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणाने तळ गाठला होता.
दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते.आज दुपारी एक वाजेच्या सुमारास या धरणाच्या सांडव्यावरून पाणी उलटले.तर दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.
इगतपुरी तालुक्यातील धरणसाठा
दारणा :-76 टक्के
कडवा:-84 टक्के
मुकणे:-21 टक्के
वैतरणा :-77 टक्के
भावली :-100 टक्के(ओव्हरफ्लो)