शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आधी फटाके फोडा, मग ऊसतोड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:39 IST

आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले.

ठळक मुद्देवनविभागाचा सल्ला : बछड्यांचे दर्शनवनरक्षकांचा मानूर मळ्यात ठिय्या

नाशिक : आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले. याबाबतची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला मिळताच वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी ऊसशेतीचा बांध गाठला. ‘आधी फटाके फोडा, मग ऊसतोडणी करा...’ असा सल्ला देत दिवसभर ऊसतोड कामगारांसोबत पहारा दिला.बिबट्याच्या पाऊलखुणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या ऊसशेतीच्या परिसरात आठवडाभरापूर्वीच आढळून आल्या होत्या. यामुळे या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याने बांधालगत पिंजरादेखील तैनात करण्यात आला; मात्र गुरुवारी सकाळी बिबट्याचे बछडे येथील काही शेतमजुरांना दिसल्याने वनविभागाचे वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांशी चर्चा करत बछडे दिसल्याची खात्री पटविली. त्यानंतर काही फटाके फोडून ऊसतोड कामगारांना ऊस कापण्यास सांगितले. दुपारी ४ वाजेपर्यंत वनकर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून होते; मात्र ऊसतोड सुरू झाल्यानंतर कोयत्यांचा येणारा सपासप आवाज आणि नागरिकांची वर्दळ यामुळे बिबट मादीने आपल्या बछड्यांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असावे, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. निम्म्यापेक्षा अधिक ऊसतोड करावयाची आहे. शुक्रवारी (दि.२०) पुन्हा ऊसतोडीला प्रारंभ केला जाणार आहे.पिंजºयाचा दरवाजा बंद; ट्रॅप कॅमेरा सुरुवनअधिकारी व कर्मचाºयांनी गुरुवारी संध्याकाळी पुन्हा बांधावर धाव घेतली. येथे लावण्यात आलेल्या पिंजºयाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. जेणेकरून या पिंजºयात बिबट मादी किंवा तिचे बछडे जेरबंद होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. कारण बछडे जेरबंद झाले तर मादी आक्रमक होऊन जवळच्या मानवी वस्तीजवळ धोका पोहचवू शकते. तसेच मादी जेरबंद झाली तर पिल्लांची उपासमार होऊ शकते, त्यामुळे वनअधिकाºयांनी हा निर्णय घेतला. बिबट मादी, बछडे यांच्या हालचाली टिपण्यासाठी संध्याकाळी ऊसशेतीच्या बांधावरच ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या