शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करणारे चौघे संशयित ताब्यात

By admin | Updated: July 1, 2017 00:20 IST

कुरापत काढून गोळीबार करणाऱ्या टोळीतील संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव या तिघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून, तर संदीप पगारे यास नाशिकमधून ताब्यात घेतले़

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पेठरोडवरील बाजार समितीत भरेकरी व्यवसाय करणाऱ्या संदीप लाड या युवकाने हप्ता दिला नाही या कारणावरून कुरापत काढून त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव या तिघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून, तर संदीप पगारे यास नाशिकमधून शुक्रवारी (दि़३०) ताब्यात घेतले़पेठरोडवरील डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारील हॉटेलमध्ये मित्रांसमवेत गुरुवारी (दि. २९) चहा पिण्यासाठी गेलेल्या फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) याच्यावर गोळीबार करून जखमी केल्याची घटना घडली होती. शेखर निकम यास लाड याने हप्ता दिला नाही या कारणावरून संशियतांनी पाळत ठेवली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लाड हॉटेलमध्ये असताना संशयित पेठरोडवरील हॉटेलमध्ये आले त्यावेळी केतन निकम याने त्याच्याकडील बंदुकीतून लाड गोळी झाडली होती़ त्यात लाडच्या छातीजवळ गोळी लागल्याने तो जखमी झाला व संशयित फरार झाले़ पेठरोडवर भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांची पळापळ झाली होती.  या प्रकरणी जखमी लाड याचा नातेवाईक सुरज बोडके याने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित शेखर निकम, केतन निकम, संदीप पगारे, विशाल भालेराव व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी परिसरात सापळा रचून प्रथम संदीप पगारे यास ताब्यात घेतले होते, तर उर्वरित संशयित पसार झाल्याने त्यांच्या शोधार्थ विविध भागांत पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पूर्ववैमनस्य की हप्ता वसुली ? संदीप लाड या युवकावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी पेठरोडवर घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सहा-सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी लाड व संशयित यांच्यात हप्ता न दिल्याच्या करण्यावरून वाद होता की सावकारी व्यवसाय या दोन्ही बाजूंचा पोलिसांकडून तपास सुरू आहे़, तर दुसरीकडे संशयित शेखर निकमचा भाऊ किरण निकम याचा काही दिवसांपूर्वीच खून झाला असून, त्या वादातून गोळीबाराची घटना घडली याचाही तपास पोलीस करीत आहे.