शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार

By admin | Updated: August 20, 2016 01:24 IST

दोन जखमी : पत्नी आणि मित्रावर झाडल्या गोळ्या; घरगुती भांडणातून घडला प्रकार

 इंदिरानगर : घरगुती भांडणातून पतीने आपल्या पत्नीसह मित्रावरही गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित पतीस पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक परदेशी (वय ३०, रा. साईराम रो-हाउस, पाथर्डी शिवार, म्हाडा कॉलनीजवळ याने आपला मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (वय ४३, रा. माडसांगवी) यास वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी बोलविले होते. दोघा मित्रांनी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर नागेश्वर हा आपल्या घरी जाण्यास निघाला असतानाच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दीपक आणि त्याची पत्नी कोमल यांच्यात भांडण झाले. भांडण वाढत गेल्यानंतर दीपकचा राग अनावर झाला. त्याने आपल्याजवळील गावठी कट्टा काढून त्यातून कोमलवर गोळी झाडली. यावेळी नागेश्वर हा कोमल हिला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता दीपकने त्याच्यावरही दोन गोळ्या झाडल्या.या घटनेने भयभीत झालेला नागेश्वर स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करीत घराबाहेर पडला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी जखमी नागेश्वर आणि कोमल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर मात्र दीपक फरार झाल्याने पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेण्यात आले. (वार्ताहर)