शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून हवेत गोळीबार

By admin | Updated: August 31, 2016 01:13 IST

थरारनाट्य : युवकांचा सिनेस्टाइल पाठलाग; राजराजेश्वरी चौकात पकडले

नाशिकरोड : नांदुरनाका येथे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना बघून दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या संशयितांचा पाठलाग करताना पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना येथील राजराजेश्वरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. केवळ पोलिसांना पाहून पळण्याच्या चुकीमुळे पोलिसांचाही संशय बळावला आणि सुरू झाले पाठलाग नाट्य...अपघातात जखमी झालेल्या मित्राला भेटून सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिव्हा, पल्सर, हिरो होंडा स्प्लेंडर या तीन दुचाकीवरून ६-७ युवक जत्रा हॉटेलकडून नांदुरनाक्याकडे येत होते. यावेळी आडगाव पोलीस ठाण्याचे बीटमार्शल व गस्ती पथकाचे वाहन गस्त घालत असताना पोलिसांना बघून दुचाकीवरील युवक नांदुरनाक्याच्या दिशेने सुसाट पळाले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. ते युवक नांदुरनाक्याकडून जेलरोडच्या दिशेने पळाल्याने पोलिसांनी पाठलाग करत सदर घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने बिनतारी संदेश यंत्रणेवरून सदर घटनेची माहिती देताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे बीटमार्शल गणेश गोसावी, मोहन संगमनेरे हे जेलरोड पवारवाडी येथून दसक स्मशानभूमी येथे दुचाकी अडविण्यास उभे राहिले, परंतु त्या दुचाकीवरील युवकांनी हुलकावणी देत तेथूनही पळ काढला. बीटमार्शल गोसावी व संगमनेरे यांनी लागलीच त्या युवकांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एकाने आपली दुचाकी पंचक रस्त्याकडे वळविली तर इतर दोन्ही दुचाकींवरील युवक बिटकोच्या दिशेने जाऊ लागले. अन् पोलीस झाले निश्चिंतसंबंधित तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच अ‍ॅक्टिव्हा व स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेलेल्या या युवकांना आणून खातरजमा केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र भरधाव वेगात वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना, गाडीचा विमा नाही, पोलिसांना न जुमानता पळून गेले म्हणून राज मणियार व नदीम सय्यद यांच्यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई : पोलिसांच्या भीतीने त्यांनी काढला पळपोलिसांनी संशयास्पद दुचाकीवरून पळून जाणाऱ्या युवकांना पकडण्यासाठी हवेत गोळीबार करून पकडल्याचे समजल्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिरोहोंडा स्प्लेंडर (एमएच १५ एझेड ७२६३) हिच्यावरून पळून जाणारे राज अन्वर मणियार (रा. लोहार गल्ली), नदीम अल्ताफ सय्यद (रा. धनगर गल्ली, देवळालीगाव) या दोघांची कसून चौकशी केली असता ते व त्याचे मित्र एकलहरारोड येथे अपघातात जखमी झालेल्या मित्रास भेटण्यास गेले होते. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने पोलीस कारवाई करतील म्हणून घाबरून पळत असल्याचे उघडकीस आले.