शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या आतषबाजीत प्रचारफेरी

By admin | Updated: February 20, 2017 00:15 IST

प्रचाराची सांगता : शहरातील सर्वच प्रभागात उमेदवारांकडून मतदारांना साकडे

नाशिक : मतदानानंतरचा निकाल काहीही लागो, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रचार रॅलीतच फटाक्यांची आतषबाजी केली. शहरातील अनेक भागात प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय प्रत्येक मंदिरासमोर थांबून उमेदवाराने देवाचे दर्शनही घेतले. शहर परिसरात अशाच प्रकारचे चित्र दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांसह अपक्षांनीही प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सकाळपासून परिसरात प्रचार रॅलीच्या घोषणांनी परिसर दाणून गेला होता. सकाळी दहा,  अकरा वाजेपासूनच प्रचार रॅलींना सुरुवात झाली होती. रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. हातात पक्षाचा ध्वज, डोक्यावर टोपी आणि गळ्यात पक्षाचा स्कार्प घालून परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली.  कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, प्रचाराचा रथ आणि त्यावरील प्रचारजिंगल्स असे आवाज एकसारखे येत होते. सकाळी दहा ते दुपारी बारा- एक वाजेपर्यंत उमेदवारांच्या रॅली सुरू होत्या. कार्यकर्त्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी थंडपेय, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख चौक तसेच मंदिर परिसरात आल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते फटाके फोडत होते.  जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू होते. कालपासूनच झोपडपट्टी परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुषांना रॅलीचे आमंत्रण देण्यात आले होते. कार्यकर्ते जमविण्याची जबाबदारी असलेल्या कार्यकर्त्यालाही कार्यकर्ते शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. कारण एकाच दिवशी सर्वच उमेदवारांच्या प्रचार रॅली असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी देखील धावपळ झाली. (प्रतिनिधी)