नाशिक : महापालिकेने आतापासूनच शहरात ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या गाळ्यांबाबतची यादी निश्चित केली असून, परवानगीसाठी ती पोलीस आयुक्तालयाकडे पाठविली आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फटाक्यांच्या गाळ्यांची लिलावप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. यंदा दीपोत्सवाला ७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. दीपोत्सवाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर शहरात विविध ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लागतात. यंदाही फटाक्यांच्या गाळ्यांसंबंधीचा विभागनिहाय अहवाल महापालिकेने विभागीय अधिकाऱ्यांकडून मागविला असून, प्रामुख्याने गोल्फ क्लब ईदगाह मैदान याठिकाणी सुमारे ३० गाळे, तर नाशिकरोड येथे २८ गाळ्यांची उभारणी केली जाणार आहे.
फटाके गाळ्यांचा लवकरच लिलाव
By admin | Updated: October 19, 2015 22:10 IST