शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत पेट्रोलपंपाच्या टाकीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:40 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील इंडियन आॅइल पेट्रोलपंपाच्या पेट्रोल टाकीला शनिवारी सकाळी आग लागली.

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण मिळविण्यात यशशॉर्टसर्किट झाल्याने पेट्रोलने पेट घेतल्याने आग

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील इंडियन आॅइल पेट्रोलपंपाच्या पेट्रोल टाकीला शनिवारी सकाळी आग लागली.तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घोटी येथील नटराज पेट्रोलपंपाच्या वीस हजार लिटर क्षमतेच्याभूमिगत पेट्रोल टाकीचे स्वच्छतेचे काम करत असताना टाकीच्या तळाशी असलेले पेट्रोल काढत असताना टाकीजवळून गेलेल्या वीजवाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने पेट्रोलने पेट घेतल्याने आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. पंपावरील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व घोटी टोल नाका आणि इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेला कळविण्यात आले. अग्निशमन यंत्रणेने त्वरित येऊन आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती घोटी पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, कर्मचारी धर्मराज पारधी, सुहास गोसावी आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.