शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

By admin | Updated: March 24, 2017 23:54 IST

मनमाड : वेळ सकाळी १० वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजू लागला. सर्वत्र एकच धावपळ उडाली.

मनमाड : वेळ सकाळी १० वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजू लागला. सर्वत्र एकच धावपळ उडाली. प्रकल्पातील इंधन टाकीच्या व्हॉल्व्हजवळ लिकेज होऊन आग लागल्याची सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात येते. अग्निशमन दल, सहायक दल व बचाव दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. जिवाची पर्वा न करता फोम व पाण्याच्या फवाऱ्यांनी अवघ्या काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश मिळते व हिरवा झेंडा फडकवून धोका टळल्याचा संदेश देण्यात आला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु याचे निमित्त होत अचानक अशी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचणी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले प्रात्यक्षिक. मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पात चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा तसेच आग विझवणारी उपकरणे व यंत्रसामग्री याची गुणवत्ता व परिस्थिती तपासण्यासाठी वर्षातून दोन वेळा आपत्कालीन आग प्रतिबंधक प्रात्यक्षिकांचे आयोजन इंधन कंपन्यांमध्ये करण्यात आले होते. प्रकल्प प्रबंधक देवीदास पानझाडे यांनी उपस्थित परिक्षकांचे स्वागत करून प्रकल्पाची व्याप्ती तसेच सुरक्षा साधने व उपाययोजनांची माहिती दिली. इंधन टाकी क्रमांक २ सी जवळ गळती होऊ लागल्याने आग लागते. धोक्याचा सायरन वाजल्यानंतर तीनही दलाचे जवान घटनास्थळी दाखल होतात. पंपाद्वारे फोमचा मारा करून आगीवर नियंत्रण आणण्यात येते. बाजूलाच असलेल्या इंधनाच्या टॅँकरला उष्णतेची झळ पोहोचू नये यासाठी पाण्याचा फवारा मारण्यात येतो. अवघ्या १५ मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळते व धोका टळल्याचा संदेश देण्यात येतो. प्रात्यक्षिकानंतर आयोजित चर्चासत्रात प्रात्यक्षिकादरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व उणिवा तसेच अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. मनोज नलावडे व जयश्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)