शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन

By admin | Updated: August 4, 2016 01:37 IST

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन

 नाशिक : मंगळवारी शहरात कोसळलेल्या पावसामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मर्यादा उघड झाल्या. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असूनही केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांचा उपयोग करता आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे तब्बल १४० जवान चोवीस तास आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना दिसून येत आहेत.महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मंगळवारी आणि बुधवारी १४७ कॉल्स आले. त्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी अधिक होत्या. सुमारे ९३ ठिकाणी पाणी साचल्याचे कॉल्स आले तर २० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी आगी लागल्या तर २९ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन राबवावे लागले. या साऱ्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे १४० कर्मचारी कार्यरत होते. निळ्या रेषेतील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे मोठे आव्हानात्मक काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागले. दलाने एरंडवाडी येथील १२५ रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. तर रामकुंड याठिकाणी अडकलेल्या १२ प्रवाशांची बोटीच्या साहाय्याने सुटका केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्मला कॉन्व्हेंट परिसरातील रामजानकी परिसरातील ४ वृद्ध महिलांची तसेच तेथील जवळच एका बंगल्यातून वृद्ध दाम्पत्याची सुटका करण्यात आली. अग्निशमनच्या बचाव पथकाने चांदोरी-सायखेडा याठिकाणीही धाव घेत आठ जणांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध आहे परंतु त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने साधनसामग्रीचा फारसा प्रभावीपणे वापर करता येऊ शकला नाही.