त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव येथील हट्टीपाडा येथील शेतकरी भावडू वारे यांच्या शेतातील घराला अचानक आग लागून त्यात मोठे नुकसान झाले आहे. आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झाल्याने वारे यांचे संसारोपयोगी साहित्यही भस्मसात झाले. घरातील सर्व सदस्य हे शेत कामासाठी गेल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.भावडू वारे यांच्या घरातील धान्य जाळून खाक झाले आहे. घराशेजारी बांधलेल्या बैलाला थोडी इजा झाली. या आगीत ४० ते ४५ पोत भात, महत्वाचे दस्तावेज, रोकड तसेच संसारोपयोगी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. श्रमजीवी संघटनेचे नेते भगवान मधे यांनी याबाबत तात्काळ त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांच्याशी संपर्कसाधून याबाबत माहिती दिली. पवार यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, पवार यांनी याबाबत जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाला माहिती दिल्याचे सांगितले. आगीत शेतकºयाचे मोठे नुकसान झाल्याने वास्तव दर्शी पंचनामा करून शेतक-याला मदत करण्याची मागणी भगवान मधे यांनी केली आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.
आगीत शेतक-याचे घर जळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:44 IST
देवगाव : संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
आगीत शेतक-याचे घर जळून भस्मसात
ठळक मुद्देदेवगाव येथील हट्टीपाडा येथील शेतकरी भावडू वारे यांच्या शेतातील घराला अचानक आग