येवला :-तालुक्यातील गवंडगाव येथील खळगे वस्तीवरील शेतकर्याच्या साठवून ठेवलेल्या १४ ट्रॉलीच्या चार्याला अचानक पणे आग लागल्याची घटना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत सुमारे ५० हजार रु पयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गवंडगाव येथील खळगे वस्तीवरील शेतकरी पोपट चांगदेव भागवत यांनी आपल्या घराच्या समोर सुमारे २० ते २५ ट्रॉलीचा चारा आगामी दुष्काळ लक्षात घेता साठवून ठेवला होता. मात्र रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास या चार्यास अचानक आग लागली. काही क्षणातच या वाळलेल्या चार्याने रु द्र रूप धारण केले. अ ग्निशामक दलातील तुषार लोणारी, नितीन लोणारी, कृष्णा गुंजाळ यांनी शिताफीने प्रयत्न करून आग विझवली. दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने चारा पसरविण्यात आला व पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर पूर्णपणे आग विझवली गेली. दरम्यान दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकर्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती मदत मिळावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गवंडगाव येथे चाऱ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:51 IST
येवला :- तालुक्यातील गवंडगाव येथील खळगे वस्तीवरील शेतकर्याच्या साठवून ठेवलेल्या १४ ट्रॉलीच्या चार्याला अचानक पणे आग लागल्याची घटना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत सुमारे ५० हजार रु पयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गवंडगाव येथे चाऱ्याला आग
ठळक मुद्देयावेळी भागवत यांनी परिसरातील शेतकर्यांनी बाजूलाच असलेल्या सायपणच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. यावेळी येवल्यातील अिग्नशमन दलाला पाचारण करण्यात आले.