शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

पार्किंग व्यवस्थेसाठी मिळेना कंत्राटदार

By admin | Updated: May 21, 2017 01:38 IST

नाशिक : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात १२ ठिकाणी यांत्रिक पद्धतीची रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात १२ ठिकाणी यांत्रिक पद्धतीची रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला परंतु, तीनवेळा निविदा काढूनही सदर व्यवस्थेसाठी कंत्राटदार पुढे येत नसल्याने महापालिकेने याप्रकरणी फेरविचार सुरू केला आहे. चौथ्यांदा निविदाप्रक्रिया राबवताना नेमक्या अडचणी लक्षात घेऊन त्यात गरजेनुसार सुधारणा करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. महापालिकेने शहरातील वाहनतळांचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. त्यात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सदर रोटरी पार्किंग व्यवस्थेसाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आवार, पंडित कॉलनीत लायन्स क्लबजवळील जागा, अशोकस्तंभ गुरांच्या दवाखान्याजवळ, शालिमार व सराफ बाजार ही ठिकाणे निश्चित केली आहेत. तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राजीव गांधी भवन, इंद्रकुंड, निमाणी चौक, मालेगाव स्टॅण्ड, सोमाणी उद्यान नाशिकरोड याठिकाणी रोटरी पार्किंग व्यवस्था साकारली जाणार आहे. त्यात यांत्रिक पद्धतीने एकावर एक अशी वाहने उभी करण्याची व्यवस्था असणार आहे. महापालिकेने शहरात रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी तीनवेळा निविदाप्रक्रिया राबविली परंतु, निविदा भरण्यासाठी एकही कंत्राटदार अथवा संस्थेने त्यास प्रतिसाद दिलेला नाही.