शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

घरबसल्या शोधा मतदारयादीत आपले ‘स्थान’

By admin | Updated: February 10, 2017 00:31 IST

दिलासा : तरुणाने विकसित केले मराठी अ‍ॅप

नाशिक : राज्यातील कुठल्याही जिल्ह्याचे तुम्ही मतदार असले तरी सहज घरबसल्या तुमच्या अ‍ॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीवरून आपल्या जिल्ह्याच्या मतदारयादीमध्ये संपूर्ण कु टुंबाचे ‘स्थान’ जाणून घेता येणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नाशिककर तरुणाने ‘वोटर लिस्ट इन मराठी’ नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येते.राज्यातील सध्या दहा महानगरपालिका निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. निवडणुका आल्या की मतदारयादीत आपले नाव शोधणे हे मतदारांपुढे मोठे आव्हान असते. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विविध राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या याद्या धुंडाळून नावे शोधत त्यांची चिठ्ठी (स्लीप) घेऊन यायची ही पारंपरिक पद्धत. मात्र आता हा खटाटोप करण्याची मतदारांना गरज नाही. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नाशिकच्या कर्णनगर परिसरात राहणारा तरुण कौस्तुभ भडमुखे याने आपल्या ज्ञानाचा फायदा जनतेला व्हावा या उद्देशाने मराठी भाषेमधून ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवरून सहजरीत्या मोफत डाउनलोड करता येते. या अ‍ॅप्लिकेशनचे वैशिष्ट म्हणजे राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामधील मतदार आपले नाव सहज शोधू शकतो. यासाठी त्याला मतदान कार्डावरील क्रमांक लिहून स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांची नावे मिळू शकतात. नावांबरोबर यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्राची माहिती मिळते. हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे.अ‍ॅप्लिकेशन हाताळण्यासाठी अत्यंत सुटसुटीत असल्यामुळे ते कोणालाही सहजरीत्या सुलभ वापरता येऊ शकते. या अ‍ॅप्लिकेशनवरून मिळालेली यादी भाग क्रमांक व त्यामधील अनुक्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांकावरून त्या केंद्रावर जाऊन संबंधित कें द्र अधिकाऱ्याला ओळखीचा पुरावा व सदर माहिती दाखवून मतदान करता येणार आहे. (प्रतिनिधी)