शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

रेशनवरील डाळीला मिळेना गुदाम

By admin | Updated: August 24, 2016 00:53 IST

तूरडाळ वांध्यातनिकृष्ट दर्जा : खुल्या बाजारापेक्षा अधिक दर

नाशिक : खुल्या बाजारापेक्षा वीस रुपयांहून अधिक दर व त्यातच निकृष्ट दर्जामुळे रेशनवरील स्वस्त दरातील तूरडाळ वांध्यात सापडली असून, काही तहसीलदारांनी सदरची डाळ गुदामात उतरवून घेण्यास नकार देतानाच, खुद्द रेशन दुकानदारांनीही डाळ स्वस्त करा, तरच ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. दोन महिन्यांपासून खुल्या बाजारात दोनशे रुपयांना भिडलेली तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो या प्रमाणात १०३ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी खुल्या बाजारातून ठेकेदाराकरवी तूरडाळ पुरविण्याचा ठेकाही देण्यात आला. नाशिक जिल्ह्यासाठी चार हजाराहून अधिक क्विंटल तूरडाळ मंजूर करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून ठेकेदाराने तूरडाळ पुरविण्यास सुरुवात केली, परंतु तिचा दर्जा अगदीच निकृष्ट असल्याचे दिसून आले. नांदगावच्या तहसीलदारांनी तूरडाळीची तपासणी केली असता, ती दर्जाहीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तूरडाळ परत पाठवून दिली. असाच प्रकार नाशिकच्या धान्य वितरण अधिकाऱ्यांनी केला. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० ते ९० रुपये असताना १०३ रुपये दराने तूरडाळ रेशनवर विक्री होणार नाही तसेच या डाळीचा दर्जाही योग्य नसल्याचे सांगत, नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेली डाळ त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)