शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्सची लाखोंची फसवणूक

By admin | Updated: April 8, 2017 00:49 IST

नाशिक : फायनान्स कंपनीला तारण देत पुन्हा अधिक कर्ज घेऊन ते न फेडता ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगरमध्ये घडला आहे़

नाशिक : फायनान्सकडून फ्लॅटवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्याच फ्लॅटचा खोटा विक्री व्यवहार केल्याचे दाखवून पुन्हा तो फ्लॅट त्याच फायनान्स कंपनीला तारण देत पुन्हा अधिक कर्ज घेऊन ते न फेडता ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा परिसरातील गोविंदनगरमध्ये घडला आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्यात श्रीराम फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक संदीप भास्कर घुगे (३२, गोविंदपार्क अपार्टमेंट, वासननगर, पाथर्डी फाटा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निरंजन शिवाजी ठाकरे, शोभा ठाकरे, बालाजी व्यंकटरणम अय्यर व ज्ञानेश अवचट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये श्रीराम फायनान्स कंपनीकडून फ्लॅटसाठी कर्ज घेतले़ या कर्जाची परतफेड न करता संशयितांनी आपसात संगनमत करून फ्लॅटच्या खोटा विक्रीचा व्यवहार केला व पुन्हा हा विक्री केलेला फ्लॅट श्रीराम फायनान्स कंपनीलाच तारण देत पुन्हा ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले़ यानंतर कर्जाची परतफेड न करता कंपनीचा विश्वासघात केला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)