नाशिक : गावखेड्यातील तसेच आदिवासी भागातील नागरिकांना लाॉकडाऊनच्या काळात पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळाला. लाॅकडाऊनमधील निर्बंध आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. शिवाय शासकीय कामकाजाच्या वेळाही मर्यादित करण्यात आल्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाले असतांफना पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सुमारे ——— कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. लाॉकडाऊनमध्ये बँक आणि परिणामी एटीएम बंद असताना पोस्टाने घरपोच पैसे पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जेथे बँका आणि एटीएमची सुविधाच नाही किंवा कमी आहे, अशा गावागावांमध्ये पोस्ट पेमेंट बँक पोहोचली आहे. या माध्यमातून नागरिकांना पैसे काढता आणि जमाही करता आले. आधारलिंक असलेल्या या योजनेचा ——— नागरिकांना लाभ झाला. पोस्टमनकडे असलेल्या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पैसे पोहोचविता आले. पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक यांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच बँकिंग सुविधा मिळाली. बायोमेट्रिक यंत्रणेच्या माध्यमातून सेवा देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही बँकेत खाते असलेल्या ग्राहकाला घरबसल्या आपले बँक खाते हाताळता आले. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद आला.
लॉकडाऊनमध्ये पोस्टबँकेकडून आर्थिक आधार; जिल्ह्यात १६ कोटी रुपयांचे वाटप (वाटप रुपये आणि लाभ घेतलेल्या नागरिकांचे आकडे टाकलेले नाहीत...)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST