शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार

By admin | Updated: April 8, 2017 00:36 IST

नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत.

 नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बेचैनी वाढली आहे. त्यातच मार्च एण्डला दिलेले धनादेशही वटत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मक्तेदारांनी लेखा विभागाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना पाचारण केले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत नोटाबंदीनंतर अचानक चार दिवसांत जमा झालेल्या ३४१ कोटींची गंगाजळी स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच जिल्हा बॅँकेत जमा होणारे जिल्हा परिषदेच्या हजारो प्राथमिक शिक्षकांचे वेतन होत नसल्याने त्यांनी त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाचा १७ कोटींचा धनादेश वटत नसल्याने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हा १७ कोटींचा धनादेश जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करीत क्लिअर केला होता. आताही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे सुमारे ३५ ते ४० कोटींच्या रकमेचे धनादेश क्लिअर होणे बाकी आहे. तसेच विकासकामांच्या पोटी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने अदा केलेली सुमारे ७० ते ८० कोटींची देयकेही रखडली आहे. त्यामुळे काही मक्तेदार जिल्हा परिषद व जिल्हा बॅँकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहेत. तिकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय पातळीवर चर्चा करून जिल्हा बॅँकेला एक संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. सोमवारी (दि. १०) मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांना जिल्हा परिषदेत बोेलविले आहे. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)