शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने बिकट : ढोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:21 IST

महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालून आवश्यक त्याच ठिकाणी खर्च करावा, तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च नियंत्रणात ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक सचिन ढोले यांनी केले.

ठळक मुद्देविद्युत भवन येथे आढावा बैठकढोले यांनी विभागनिहाय आढावा घेतला कर्मचारी पोर्टल लवकरच सुरू

नाशिकरोड : महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालून आवश्यक त्याच ठिकाणी खर्च करावा, तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च नियंत्रणात ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक सचिन ढोले यांनी केले.नाशिकरोड विद्युत भवन येथे गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत नाशिक परिमंडलांतर्गत बाह्यस्त्रोत कर्मचाºयांची आवश्यकता, सद्यस्थिती, त्यांचे वेतन व इतर प्रश्न, बाह्यस्त्रोत कर्मचारी धोरणाची अंमलबजावणी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रलंबित चौकशी प्रकरणे, पदोन्नती धोरण व नियोजन, प्रलंबित गोपनीय अहवाल निपटारा आदी विषयांबाबत ढोले यांनी विभागनिहाय आढावा घेतला.मनुष्यबळ ही व्यवस्थापनाची संपत्ती असून, व्यवस्थापनाच्या हितासाठी मानव संसाधन विभागाने कर्मचाºयांचे सर्व प्रकारचे प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्यावर भर द्यावा. जेणेकरून कर्मचारी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करेल. महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांसाठी आस्थापनाविषयक बाबी व इतर अशा ६२ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणारे कर्मचारी पोर्टल लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे ढोले यांनी सांगितले. उपविभागनिहाय बाह्यस्त्रोत कर्मचाºयांचा सेतू तयार करून आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ज्यातून नियमित कर्मचाºयांना जादा वेळ काम केल्याबद्दल द्याव्या लागणाºया अधिकच्या पैशांची बचत होऊ शकेल अशी सूचना ढोले यांनी केली. यावेळी ढोले यांच्या हस्ते कर्मचाºयांना सुरक्षा गॉगल आणि प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्टाचे अर्ज देण्यात आले. बैठकीला नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता शैलेश राठोर, अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी महाव्यवस्थापक सुनील पाठक, सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, विश्वास पाटील, महाव्यवस्थापक अनिल बराटे, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.