शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

...अखेर वसंत गितेंचा पदाचा ना‘राजीनामा’

By admin | Updated: November 4, 2014 00:31 IST

मनसेत फूट : पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा सत्र

नाशिक : नाशिकमधील मनसेचे सर्वेसर्वा मानले गेलेले नेते माजी आमदार वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पाठोपाठ त्यांच्या समर्थनार्थ दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे कृष्णकुंजवर पाठविले आहेत. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाचे पोस्टमार्टेम करण्यासाठी येत्या बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार असताना, दोनच दिवसांपूर्वी ही उलथापालथ घडल्याने राजगडाला धक्का बसला आहे.वसंत गिते हे भाजपा-सेनेच्या संपर्कात असल्याची यापूर्वीच चर्चा होती. स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यास दुजोरा दिला असला, तरी गिते यांनी मात्र त्याचा इन्कार केला असून, आपण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे; परंतु पक्ष सोडलेला नाही, असे सांगितले. असे असले तरी गिते आपल्या किमान वीस नगरसेवकांना घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने अन्य नेत्यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेऊन तटबंदी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता असल्याने नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. (पान २ वर)मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्याबरोबर असलेले गिते हे पक्षातील सर्वेसर्वा होते; परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांनी नाशिकमध्ये आणि विशेषत: महापालिकेतील सत्तेची सूत्रे पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकले यांच्याकडे दिली आणि त्यानंतर गिते यांची नाराजी सुरू झाली होती. दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गिते यांनी राज यांना भेटण्याचे टाळले होते. यानंतर राज यांनी गिते यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेची मुंबईत व्यवस्था केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांच्यासह नाशिकमधील सर्वच जागांवर पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राज हे नाशिकमध्ये येऊन मोठे फेरबदल करणार असल्याची चर्चा असताना गिते यांनी राजीनामा दिला. आठ वर्षे आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली; परंतु वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव प्रदेश सरचिटणीस पदावर काम करू शकत नसल्याने आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती गिते यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे. राजीनाम्यानंतर गिते हे कार्यकर्त्यांना सामोरे गेले नाही. तथापि, मुंबई नाका येथील त्यांच्या कार्यालयात कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी महापौर अशोक मुर्तडक यांनी नगरसेवकांची पालिकेत ओळखपरेड घेतली. कोणताही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नसल्याचे मुर्तडक आणि शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी सांगितले.