शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर नाशिक रेड झोनमधून बाहेर, १ जूननंतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असून, पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आल्याने धोकादायक रेड झोनमधून नाशिक जिल्हा बाहेर पडला ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असून, पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आल्याने धोकादायक रेड झोनमधून नाशिक जिल्हा बाहेर पडला आहे. त्यामुळे १ जूनपासून नाशिक जिल्ह्यातील निर्बंध शासनाकडून शिथिल होण्याचे संकेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील काेरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रुग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार रुग्णच शहरात उपचार घेत आहेत. तसेच पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेल्या रेड झोन जिल्ह्यातून नाशिक जिल्हा बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात ऑक्सिजन टंचाई जाणवल्याने आता कोरोनाच्या बाबतीत नाशिक जिल्हा स्वयंपूर्ण होत आहे. जिल्ह्यात ५५ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांचे काम सुरू आहे. केंद्र शासन आणि कार्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून त्यासाठी निधी मिळाला आहे. याशिवाय ७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेले कारखाने सध्या नाशिक जिल्ह्यात येत आहेत. राज्य सरकारकडून अशा प्रकल्पांना मदत करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसबाबत गांभीर्याने उपाय सुरू आहेत. आत्तापर्यंत ३३८ रग्ण आढळले असून, २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिससाठी शस्त्रक्रिया करावी लागत असल्याने सहा ऑपरेशन थिएटर तयार करण्याचे काम सुरू आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.