शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर बछडे मादीच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:34 IST

सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरेयांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेला ऊसतोड कामगारांना चार बछडे आढळून आले होते.

ठळक मुद्दे मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरेयांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेला ऊसतोड कामगारांना चार बछडे आढळून आले होते.वनविभागाने शेताच्या शेजारी क्रेटमध्ये हे बछडे ठेवले होते. रविवारी पहाटे बिबट्या मादी बछड्यांच्या शोधार्थ बाहेर पडली. त्यांना अलगद उचलून उसाच्या शेतात गेली. तब्बल १७ तासांनी बिबट्याची मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.बछड्यांना स्वीकारले नाही तर मादी किमान पिंजºयात तरी येईल, असा कयास बांधला गेला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शरद थोरात, के.आर. इरकर, तानाजी भुजबळ, एम.व्ही. शिंदे यांनी घटनास्थळी तळ ठोकून होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बछड्यांच्या क्रेटजवळ आलेल्या मादीने त्यांना उचलल्यानंतर उसाच्या शेतात घेऊन गेली. मायलेकरांची तब्बल १७ तासांनी भेट घडवून आणल्याचे समाधान वनविभागासह स्थानिक रहिवाशांच्या चेहºयावर झळकत होते. ऊसतोड कामगारांना आढळले बछाडेसांगवी येथील शरद घुमरे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी ऊसतोड कामगारांना आढळलेल्या बछड्यांना जास्त हाताळले, त्याचबरोबर मानवी स्पर्श झाला तर मादी त्यांना स्वीकारणार नाही. शिवाय बछड्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या बिबट्याच्या मादीस पिले आढळून न आल्यास ती अधिक आक्रमक झाली असती, अशी भीती वनविभागाच्या अधिकाºयांना व्यक्त होती. त्यांनी ऊसतोड कामगारांकडून ही बछडे ताब्यात घेत त्यांना अलगत प्लॅस्टिकच्या क्रे टमध्ये ठेवले. थंडीच्या कडाक्यात त्यांना ऊब मिळावी यासाठी क्रेटच्या भोवती पाचट ठेवण्यात आले होते. शिवाय जवळ पिंजराही लावण्यात आला होता.