शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ऑक्सिजन प्लांटला महापालिकेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST

गेल्या तीन वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाच्या नगररचना विभाग या प्लांटला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ ...

गेल्या तीन वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाच्या नगररचना विभाग या प्लांटला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करत होते.

नाशिक शहरामध्ये करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन न मिळाल्याने बऱ्याच बाधित नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून ऑक्सिजन प्लांटसाठी सर्व कागदपत्र मनपा नगररचना विभागात सादर करूनदेखील ऑक्सिजन व इतर गॅस रिफिलिंग प्लांट लावण्यासाठी परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने उद्योजक साहेबराव दतीर यांनी मनपा विरोधात विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितल्या नंतर अखेरीस मनपाच्या नगररचना विभागाने प्लांट उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मनपा अधिकारी संजय अग्रवाल व त्यांच्या पथकाने अंबड औद्योगिक वसाहतीत दातीर यांच्या मालकीच्या जागेची पाहणी देखील केली.

कोट===

अंबड औद्योगिक वसाहतीत अंबड गाव लगत १२०० वार चा प्लाट आहे. या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाने परवानगी दिली असून लवकरच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणार सुरुवात करणार आहे.

-साहेबराव दतीर,उद्योजक