शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:53 IST

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या   प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी  महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून  पुढील आदेशापर्यंत चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे  कोरोना नियमांचे उल्लंघन : प्रशासनाकडून गांभीर्याने दखल

मालेगाव : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या  प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी  महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून  पुढील आदेशापर्यंत चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. शुकवारी ही बाब उघडकीस आली होती. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या यांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी सुनील खडके आणि कर्मचाऱ्यांनी मोहन चित्रपटगृहाचे मालक यश पांडे  व दीपक पवार यांना जमावबंदीचा आदेश असताना चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी  नोटीस बजावली.  सध्या चित्रपट दाखविण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.हुल्लडबाजीचा व्हिडीओ व्हायरल; प्रशासनाकडून कारवाईचा बडगासध्या मालेगावी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या पमाणावर वाढ होत असतांना  कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गंभीर दखल घेतली.  चित्रपटगृहावर शुक्रवारी सिनेमाप्रेमी मालेगावकरांची गर्दी उसळली होती. 

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या