शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:05 IST

सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल्यानतंर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

ठळक मुद्देसिन्नर : वनविभागला यश; मुसळगाव शिवारात बिबट्याची दहशत कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल्यानतंर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या तीन दिवसाच्या काळात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात एक वर्षाचा बछडा व बिबट्या मादी जेरबंद झाली असून मात्र बछड्याचा या शिवारात मुक्त वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सिन्नर- डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात गेल्या आठ दिवसांपासून आमदार राजाभाऊ वाजे व मविप्रचे संचालक हेमंत वाजे यांच्या शेतात बिबट्याच्या जोडीसह दोन बछड्यांचा वावर असल्याने अनेकांनी पाहिले होते. त्यामुळे या भागात सोमवारी (दि. २६) वनविभागाने हेमंत वाजे यांच्या आवळ्याच्या बागेत पिंजरा लावला होता. या पिंजºयात भक्ष्य ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे या पिंजºयात एक वर्षाचा बछडा अलगद अडकला. त्यानंतर उर्वरित बछडा व बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने आवळ्याच्या बागेत दुसऱ्यांदा पिंजरा लावला होता.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या अडकला होता; मात्र बछड्याच्या विरहाने बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. डरकाळ्या फोडत त्याने पूर्ण ताकदीनिशी पिंजºयाचा पत्रा वाकवून बाहेर पडला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.शनिवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक एस.बी. थोरात, ए.आर. इरकर, पी.जी. बिन्नर, बालम शेख, रमेश आवारी, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. वनविभागाने तोडलेला लोखंडी पिंजरा दुरुस्त करून पुन्हा त्याच ठिकाणी मादी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लावलाहोता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे कर्मचारी नाशिक-पुणे महामार्ग व बेलांबा शिवारात गस्त घालीत होते. मुसळगाव येथे बिबट्याची दहशत कायम तालुक्यातील मुसळगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. शनिवारी (दि.३१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावालगत ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. पोलीसपाटील दीपक गाडेकर यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिली होती. मागील आठवड्यात सुकदेव बोडके, शिवाजी बोडके यांच्या वस्तीजवळ बिबट्या महिलांना दिसला होता. या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.शनिवारी मध्यरात्री अथवा रविवारी पहाटेच्या सुमारास या पिंजºयात चवताळलेली बिबट्या मादी जेरबंद झाली. सकाळी बिबट्याने डरकाळ्या फोडल्यानंतर स्थानिक शेतकºयांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यामुळे तिसºयांदा लावलेल्या पिंजºयात बिबट्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अदांजे चार वर्षे वयाची बिबट्या मादी असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्या मादीची रवानगी मोहदरी वनउद्यानात केली आहे. अजूनही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय शेतकºयांनी व्यक्त केला आहे.