शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

अखेर बहीण-भावाची झाली भेट..

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

रक्षाबंधन : रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने अनोखे ‘गिफ्ट ’

इगतपुरी : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्याकरिता वडिलांनी मायाला सायंकाळी रेल्वेत बसवून दिले. परंतु, इगतपुरी रेल्वेस्थानकात भावा-बहिणीची चुकामूक होऊन रात्र झाली तरी बहीण न आल्याने भाऊ वाट पाहून भाऊ आपल्या पाड्याकडे घरी निघून गेला. माया शाळा शिकलेली नसल्याने आणि त्यात रात्रीची वेळ त्यामुळे ती घाबरून गेली. परंतु रात्रीच्या लोहमार्ग पोलिसांना गस्तीच्या वेळी ती घाबरलेल्या स्थितीत आढळली आणि त्यांनी तिची चौकशी करून तिला रक्षाबंधनाच्या दिवशी सुखरूप तिच्या भावाच्या स्वाधीन केले. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण सुखरूप घरी पोहोचल्याचे पाहून भावाच्याही चेहऱ्या आनंद दिसला.इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील शांताराम जाधव गावात कामधंदा नसल्यामुळे नाशिक येथे काही दिवसांपासून मोलमजुरीचे काम करतात. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याकरिता शांताराम जाधव यांनी १७ आॅगस्ट रोजी सायंकाळी माया शांताराम जाधव (१४) हिला नाशिकरोड रेल्वेस्थानकातून इगतपुरीला जाण्यासाठी सायंकाळी रेल्वेत बसवून दिले. गाडी रात्री उशिरा इगतपुरीत आली. मायाला घेण्यासाठी तिचा भाऊ श्रावण शांताराम जाधव इगतपुरी रेल्वेस्थानकात उभा होता. मात्र मायाची व श्रावणची चुकामूक झाल्याने रात्र झाली तरी बहीण न आल्याने श्रावण वाट पाहून पाहून वैतागून आपल्या पाड्याकडे घरी निघून गेला. माया भावाला शोधण्यासाठी रेल्वेस्थानकातील तीनही प्लॅटफार्मवर शोधू लागली. मायाने कधीच शाळेत गेलेली नसल्याने तिला नीट बोलताही येत नाही. स्वताबद्दलची माहिती कोणाला द्यावी हे कळत नसल्यामुळे ती अधिकच गोंधळून गेली. त्यात स्टेशनवरील काही मुलेही तिच्या मागोमाग फिरत होती. रात्रीचे १० वाजले होते. त्याचवेळी लोहमार्ग पोलिसांना गस्तीच्या वेळी ती घाबरलेल्या स्थितीत दिसून आली. त्यांनी तिची सखोल चौकशी करून विचारपूस केल्यानंतर ती चिंचलेखैरे येथे भावाला राखी बांधण्यासाठी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोहमार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाने मायाला रात्रभर रेल्वेस्थानकातील प्रतीक्षालयात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळीच चिंचलेखैरे या गावात रक्षाबंधनाच्या दिवशी सुखरूप तिच्या भावाकडे नेवून त्याच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक हेमंत घरटे, पोलीस हवालदार माधव दासरे, सतीश खर्डे, सत्यसुधन त्रिपाठी, राजेंद्र राठोड, गोविंद दाभाडे यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर).