शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर गढीचे रहिवासी स्थलांतरासाठी तयार

By admin | Updated: August 10, 2014 02:24 IST

...अखेर गढीचे रहिवासी स्थलांतरासाठी तयार

 

नाशिक : जोपर्यंत जुन्या घरांच्या अस्तित्वाबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत स्थलांतर होणार नाही, असा पवित्रा काझी गढीच्या रहिवाशांनी काही दिवसांपर्यंत घेतला होता; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या आधिकाऱ्यांना रहिवाशांची समजूत काढण्यास यश आले असून, अखेर गढीच्या रहिवाशांनी स्थलांतरास होकार दर्शविला आहे. दरम्यान, ७० ते ७५ कुटुंबांची तात्पुरती निवास व्यवस्था लगतच्या गाडगे महाराज धर्मशाळा महापालिकेची बंद पडलेली शाळा, दवाखान्यामध्ये करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले आहे.गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून काझीची गढी ढासळत चालली आहे. आठवडाभरापूर्वीच गढीचा काही भाग पुन्हा ढासळल्याने मनपा प्रशासन व रहिवाशांची झोप उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊन संरक्षक भिंत बांधण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापत होते. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी गढीवर भेट द्यावी व रहिवाशांना लेखी हमी द्यावी, या मागणीचा आग्रह करत येथील धोकेदायक कथड्यावर रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक विनायक खैरे, आमदार जयंत जाधव यांनी ठिय्या आंदोलन करत महापौरांचा निषेध केला होता; यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून पर्यायी जागेमध्ये रहिवाशांच्या स्थलांतर व निवासाची तयारी सुरू करण्यात आली आहे. गढीवरील सर्व रहिवासी हे मोलमजुरी करणारे असून, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था लगतच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत, मनपाच्या बंद पडलेल्या दवाखाना, शाळेमध्ये करण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. येत्या दोन दिवसांमध्ये काठालगतच्या सर्व धोकेदायक घरांमधील कुटुंबांना पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)