शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर जनावरे सोडली पिकात

By admin | Updated: September 5, 2015 22:06 IST

...अखेर जनावरे सोडली पिकात

सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वीतभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे बळीराजाला पावसाळ्यात दुष्काळाची अनुभूती येत आहे. सिन्नर तालुका तसा अवर्षणग्रस्तच. त्यातल्या त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्त्रोत नसल्याने पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरवडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पीके घेतली जातात. चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या खरिपाच्या पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी मृग नक्षत्रातील पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतात उतरून पडलेले पीक जळून करपून जात आहे. पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमजून गेली आहेत. आज ना उद्या पाऊस होईल व किमान खरिपाचे पीक येऊन जनावरांपुरता चारा होईल, ही बळीराजाची भोळी आशा मावळल्यात जमा आहे. त्यामुळे पिकांत जनावरांना चरण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मोलामहागाचे बियाणे पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले, नातेवाइकांकडून हातउसणे पैसे घेतले. याशिवाय शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया गेले आहे. सध्या तालुक्यातील १९ गावे व १३८ वाड्या-वस्त्यांवर २८ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखी अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. जनवारांच्या चाऱ्याची परिस्थिती अवघड झाली आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित काळ कसा जाईल, याची विवंचना बळीराजासह प्रशासनाला लागून राहिली आहे.