शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फेरमतमोजणी प्रक्रिया एक ा महिन्यापर्यंत स्थगित

By admin | Updated: April 8, 2017 01:14 IST

नाशिक : भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी केलेल्या अर्जानुसार शुक्रवारी होणारी फेरमतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेर रद्द केली.

 नाशिक : अवघ्या एका मताने पराभूत झालेले ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी केलेल्या अर्जानुसार शुक्रवारी (दि. ७) होणारी फेरमतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेर रद्द केली.फेरमतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला जनस्थान पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार धनंजय बेळे यांनी ही फेरमतमोजणी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी अर्जाद्वारे करून ही फेरमतमोजणी सावानाच्या घटनेला धरून नसल्याचे म्हटले आहे. धनंजय बेळे यांच्याप्रमाणेच फेरमतमोजणी प्रक्रियेच्या शुक्रवारी (दि. ७) सकाळी राजेश जुन्नरे, विनोद राठोड, मोहन उपासनी, मकरंद सुखात्मे, नंदन रहाणे, सतीश महाजन, श्यामला चव्हाण, प्रभाकर कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना मतपेट्यांचे सील तोडू नये तसेच फेरमतमोजणी प्रक्रिया थांबवावी या आशयाचे पत्र दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी ही फेरमतमोजणी प्रक्रिया तीस दिवसांपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी होणाऱ्या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी शुक्रवारी सकाळपासूनच सार्वजनिक वाचनालयाच्या मीटिंग हॉलमध्ये तयारी करण्यात आली होती. यावेळी या सभागृहात निवडणूक कर्मचाऱ्यांसह व्हिडीओ कॅमेराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. परंतु धनंजय बेळे यांच्यासह निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी हरकत घेतल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. तसेच धनंजय बेळे यांनी शुक्रवारी सकाळी सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फेरमतमोजणी घेण्यात येत असल्याची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल केल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी तत्काळ सार्वजनिक वाचनालयाला भेट देत याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यासह ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, शुक्रवारी सकाळी फेरमतमोजणी प्रक्रिया रद्द झाल्याची माहिती देताना माधवराव भणगे यांनी मतमोजणीच्या दिवशी ‘मी केवळ उमेदवारांच्या मतांचे वाचन केले असून, अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही’ असे सांगितल्याने सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक प्रक्रियेतील गुंता अधिकच वाढलेला असताना भणगे यांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता निकालाची अधिकृत प्रत वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे सुपूर्द केल्याने चार ते पाच तासांत कुठली चक्रे फिरली याबाबत चर्चा सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सकाळी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषण केली नसल्याचे म्हणणे आणि संध्याकाळी अध्यक्षांकडे अधिकृत निकालाची प्रत सुपूर्द करणे या घटनेमुळे निवडणूक निर्णय अधिकारी वेळोवेळी सोयीप्रमाणे भूमिका बदलत असून, या निवडणूक प्रक्रियेबद्दलचा संभ्रम अधिकच वाढला आहे. (प्रतिनिधी)