शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी’ची  आज अखेरची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:10 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरणार आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरणार आहे.  नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मार्गावर दिवसाला २४ फेºया शिवनेरी पूर्ण करीत होती; मात्र शिवनेरीची जागा आता ‘शिवशाही’ बसने घेतली आहे. यामुळे आजपासून शिवनेरी बस या मार्गावर धावणार नसल्याचे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केलेआहे.  सध्या नाशिक-पुणे मार्गावर चौदा शिवशाही बसेस दिवसाला २८ ते ३० फेºयांद्वारे प्रवासी वाहतूक करीत आहे. दरम्यान, या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाºया निमआराम वर्गातील ‘हिरकणी’लाही महामंडळाने विश्राम दिला आहे. एकूण २७ निमआराम बसेस या मार्गावरील थांबविण्यात आल्या आहेत. एकूणच धार्मिक पुण्यनगरीवरून विद्येचे माहेरघर गाठणाºयांना ‘शिवशाही’चा एकमेव आधार महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  एसटी प्रशासन उत्पन्न व प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, योजना राबवित आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवाशांना अत्याधुुनिक स्वरूपाच्या बसेसमधून प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा मात्र भाडे शिवनेरीच्या तुलनेत अर्धेच असल्याने या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने ‘शिवनेरी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.