शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

युवकावर भर दिवसा गोळीबार

By admin | Updated: June 30, 2017 00:59 IST

पंचवटी : पेठरोडवरील एका हॉटेलात फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) या युवकावर तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.

 लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पेठरोडवरील एका हॉटेलात फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) या युवकावर तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात लाड याच्या उजव्या खांद्याच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजता सदर घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर हे फुलेनगर परिसरातच राहणारे असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्लेखोरांत एका अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेठरोड फुलेनगर मच्छी बाजारात राहणारा लाड हा दुपारी पावणे तीन वाजता डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारी असलेल्या एका हॉटेलात चहा घेत असताना दोन ते तीन संशयितांनी लाड याच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. बेसावध असलेल्या लाड याच्या उजव्या खांद्याच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झाला त्यानंतर त्याला लागलीच उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सूरज बोडके यांच्या फिर्यादीवरून संशयित शेखर निकम, केतन निकम, संदीप पगारे, विशाल भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, हे चौघेही फरार आहेत. पेठरोडवरील फुलेनगर पोलीस चौकीपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलीस ताफा दाखल होऊन बंदोबस्त तैनात करण्यात आला.