नाशिक : चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करुन सुमारे २९ हजार रुपयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने सीबीएसवरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये पाचशे रुपयांच्या २६ तर हजार रुपयांच्या १३ नोटा असे एकूण २९ हजार रुपयांची रक्कम भरली. सदर भामट्याने चलनातील नव्या नोटांप्रमाणे भासणार्या बनावट नोटा तयार करुन त्याचा भरणा बॅँकेत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बॅँकेचे मुख्य रोखपाल नितीन गुलाबराव पाटील (५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक केदार करीत आहेत.
गुन्हा दाखल : चलनी पाचशे-हजारांच्या बनावट नोटांद्वारे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत २९ हजारांचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:52 IST
नाशिक : चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करुन सुमारे २९ हजार रुपयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने सीबीएसवरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये ...
गुन्हा दाखल : चलनी पाचशे-हजारांच्या बनावट नोटांद्वारे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत २९ हजारांचा भरणा
ठळक मुद्दे बनावट नोटा तयार करुन त्याचा भरणा बॅँकेत