-----
जुन्या बसस्थानक आवारातून दुचाकीची चोरी
मालेगाव : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातून १५ हजार रूपये किमतीची जुनी हिरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच १४ जे ४८६० ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गेल्या शनिवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पावणे सात वाजेदरम्यान ही चोरी झाली. सुशील रामराव देशमुख (३४) रा. सूर्योदय कॉलनी, एकनाथनगर, चर्चमागे यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. ओ. वसावे करीत आहेत.
-----
मसगा महाविद्यालयाजवळून दुचाकी चोरी
मालेगाव : शहरातील मसगा महाविद्यालयालगत असलेल्या रस्त्यावरुन अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किमतीची हिरो होंडा कंपनीची एमएच ४१ जे ९६९४ क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. गेल्या रविवारी सायंकाळी पावणे सात ते पावणे आठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. भागचंद प्रकाश शिंदे (५२) रा. माउली सोसायटी, महादेव मंदिराजवळ, चर्चमागे, कॅम्प या शिक्षकांनी कॅम्प पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक एस. एच. देशमुख करीत आहेत.