शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सिन्नर वाचनालयासाठी प्रगती-परिवर्तन पॅनलमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:20 IST

सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये ...

ठळक मुद्देनिवडणूक : कार्यवाहपदी हेमंत वाजे बिनविरोध

सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचीनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. कार्यवाहपदी हेमंत वाजे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.सत्ताधारी प्रगती पॅनलसमोर परिवर्तन पॅनलने उमेदवार उभे केले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा गेल्या निवडणुकीपासून खंडित झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नामदेव कोतवाल यांनी कार्यवाहपदासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हेमंत वाजे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या काळात महिला उमेदवार अ‍ॅड. बिना सांगळे, सुनील उगले, सोनल लहामगे, किरण मूत्रक यांनी माघार घेतली. कार्यवाहपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रगती पॅनलकडून अध्यक्ष पदासाठी कृष्णा भगत, उपाध्यक्ष पदासाठी पुंजाभाऊ सांगळे व नरेंद्र वैद्य, तर संचालकासाठी राजेंद्र देशपांडे, विलास पाटील, संजय बर्वे, मनीष गुजराथी, चंद्रशेखर कोरडे, जितेंद्र जगताप, सागर गुजर, प्रज्ञा देशपांडे, निर्मल खिंवसरा हे उमेदवार रिंगणात आहेत. सदर निवडणूक लक्षवेधी ठरणार असून, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या शुक्रवार (दि. १७) रोजी निवडणूक होत आहे.विरोधी परिवर्तन पॅनलमध्ये महिला उमेदवार बिना सांगळे यांनी माघार घेतल्यामुळे एकच महिला उमेदवार डॉ. कल्पना परदेशी तसेच कार्यवाहपदाची बिनविरोध निवड झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी डॉ. जी. एल. पवार, तर उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र अंकार तसेच अ‍ॅड. विलास पगार यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत. संचालकपदासाठी नामदेव कोतवाल, डॉ. श्यामसुंदर झळके, विजय कर्नाटकी, अशोक घुमरे, अजय शिंदे, अ‍ॅड. गोपाळ बर्के यांच्यासह दहा उमेदवार परिवर्तन पॅनलने रिंगणात उतरविले आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकlibraryवाचनालय