वासू प्रकाश शिर्दे (३५, रा. मुक्ताई कॉलनी, भायगाव) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी बापू चौधरी (पूर्ण नाव माहीत नाही), शांताराम धनवट पंचगंगा शोरूम पाठीमागे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीची येसगाव शिवारात शेती आहे. आरोपींशी त्यांचा शेतीचा व्यवहार झाला आहे. आरोपी या शेतीचा व्यवहार परस्पर दुसरीकडे करीत होते. याची फिर्यादीला माहिती मिळाली. काकाणी चित्रपटगृहाजवळून दुचाकीवर मित्र दीपक चव्हाण ( रा. चाकण) याच्या नावावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सहारा हॉस्पिटलखाली असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात गेले होते. तेथून ते परत घरी जात असताना काकाणी चित्रपटगृहाजवळ लघुशंकेसाठी थांबले असता दोन्ही आरोपी दुचाकीवर तेथे आले. तू घेतलेली हरकत मागे घे असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली व जीवे ठार मारण्याचा दम दिला. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
शेतीच्या व्यवहाराच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:18 IST