शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीचा फटका, दीड एकर मक्यावर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:51 IST

विरगाव (बागलाण) : मका पिकावरील लष्करी अळीने हैराण झालेल्या तरसाळी येथील गोपीनाथ पाटील मोहन या शेतकऱ्याने दीड एकर मका पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

विरगाव (बागलाण) : मका पिकावरील लष्करी अळीने हैराण झालेल्या तरसाळी येथील गोपीनाथ पाटील मोहन या शेतकऱ्याने दीड एकर मका पिकावर ट्रॅक्टर फिरविला. अळी निर्मूलनासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यात अपयश आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पेरणी तसेच फवारणीवर झालेला खर्च वाया गेला असून त्यांना हजारो रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.चालू वर्षी संपूर्ण बागलाण तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मका पिकावर या अळीच्या आक्र मणाचे प्रमाण काही अंशी कमी असले तरीही मात्र दुसºया टप्प्यातील मका पीक या अळीस पूर्णपणे बळी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. हे नगदी पीक वाचविण्यासाठी सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून अनेक वेगवेगळी रासायनिक औषधांची फवारणी करून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.तालुका कृषी विभागाकडूनही या अळीच्या अटकावासाठी मोफत मार्गदर्शन तसेच औषधे पुरवली जात असून या उपरोक्तही ह्या अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. याचमुळे वैतागलेल्या शेतकरी वर्गाकडून हे नगदी पीक मोडून अन्य पीक लागवडीकडे कल वाढला असून तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मका याचमुळे मोडीस निघतांना दिसत आहे. तरसाळी येथील गोपीनाथ मोहन यांनीही याचमुळे आपल्या शेतात लागवड केलेल्या साडेतीन एकर क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रावर वैतागून ट्रॅक्टर फिरविला आहे. यामुळे झालेला हजारो रु पयांचा खर्च वाया गेला असून पीकविम्यासाठी ते संबधित कंपनीकडे दाद मागणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक